प्रस्तावना
भांडुप हा मराठी आणि कोकणी लोकांचा वास्तव्य असणारा विभाग आणि त्यात देखील त्या काळात अतिशय दुर्गम असा विभाग मानला जात होता. सुसंस्कृतपणा फारच अभाव असल्याकारणाने येथे दंडगिरी करणाऱ्या अतिशय अवैध जागांचे आणि त्यातून आलेल्या काही सरकारी या विभागात सर्वांना एकत्र आणण्यासाठी एक व्यासपीठ असावे व सर्व तरुण मुले व मंडळींना एकत्र आणून काही तरी समाजोपयोगी तसेच क्रीडा क्षेत्रात काम करावे या हेतूने इ. स. १९७५ साली परिसरातील श्री. पांडुरंग वीर, श्री. विजय कदम, सुनील बारस्कर, शिवराम वीर, बबन आमले, पांडुरंग कोळटे, जगन्नाथ भोसले, नारायण कातकर, सुरेश शेलटे तसेच इतर अशा तरुण मुलांनी एकत्र येऊन डायमंड स्पोर्ट्स क्लब या मंडळाची स्थापना केली. आज या मंडळाचे विविध क्षेत्रात चांगले भरीव कार्य चालू आहे. परिसरात मोकळ्या पडलेल्या जागा या जंगले मैदानात रूपांतर करून तिथे विविध प्रकारचे खेळ खेळण्यास सुरुवात झाली. त्याचाच एक भाग म्हणून आम्ही कबड्डी क्षेत्रात खूपच नावारूपास आलो आणि जिल्हास्तरीय कबड्डी सामने देखील खेळण्यास सुरुवात झाली. संपूर्ण मुंबई आणि महाराष्ट्रभर आम्ही कबड्डीमध्ये नावारूपास आलो आहोत. सदर मंडळातून मुंबई उपनगर आणि महाराष्ट्राला खूप चांगले कबड्डीपटू दिले आहेत.
हे सर्व करत असताना आजूबाजूच्या परिसरात नवरात्रोत्सव साजरा करण्याची प्रेरणा दिली. अनुशासन मंडळाच्या काही सहकार्यांनी नवरात्रोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली आणि दुर्गामातेचा फोटो लावून भक्तिमानांनी एकत्र येऊन नवरात्रोत्सव १९७६ साली सुरू केला आणि विभागातील व परिसरातील लोकांना एक धार्मिक भावनेने एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. असे कित्यएक वर्षे नवरात्रोत्सव सदर विभागामध्ये साजरा करण्यात येत आहे.
नवरात्रोत्सव साजरा होत असताना आपले स्वतंत्र दुर्गामातेचे मंदिर असावे अशी संकल्पना सर्व कार्यकर्त्यांमध्ये झाली आणि त्यानुसार त्यावर काम करण्यास सुरुवात झाली. आणि १९९२ साली डायमंड स्पोर्ट्स क्लब (संचालित) दुर्गामाता सेवा मंडळ (रजि.) संस्थेची स्थापना झाली. व मंदिर उभारण्यासाठी प्रत्येक जण कामाला लागले. भांडुप विभागातील तसेच भांडुपच्या बाहेरील कित्यएक लोकांनी आईसाठी मंदिर उभारणीसाठी पुढाकार घेऊन मदत करण्यास सुरुवात केली आणि प्रत्येकाने जमेल तसे वस्तुरूपाने, पैशाच्या रूपाने, श्रमदानाने नागरिक, रहिवाशी सामाजिक कार्यकर्ते, तसेच राजकारणातील नेते, आमचे स्थानिक नगरसेवक पदाधिकारी यांनी आईसाठी मदतीचा ओघ वाढवला आणि दुर्गामाता मंदिर १९९७ साली उभारले गेले. आज बघता त्याला २५ वर्षे पूर्ण झाली. या पूर्ण कार्यकाळात आईसाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्या सर्वांचे मनःपूर्वक आभार व धन्यवाद!
धन्यवाद !